मुक्त ज्ञानकोशीय नोंदींमध्ये प्रामाणिकपणा : प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे
औरंगाबाद, दि.21 : सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असून इंटरनेट व सोशल मिडियामुळे वैश्विक ज्ञानाचा वेग मोठया प्रमाणात वाढला आहे. मुक्त ज्ञानकोशीय स्रोतांमुळे यामध्ये सातत्याने भर पडत आहे. ह्या माहितीवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो. म्हणून मुक्त ज्ञानकोशीय नोंदींमध्ये विश्वसनीयता, प्रामाणिकपणा व संदर्भमूल्य असावे, असे प्रतिपादन प्राचार्य प्रदीप जब्दे यांनी केले. ते मराठी विभाग व राज्य मराठी विकास संस्था आयोजित मराठी विकिपीडियाविषयक जागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षक सुरेश खोले, डॉ. दिलीप बिरूटे, ग्ंरथपाल डॉ. धर्मराज वीर, विभागप्रमुख प्रा. सतीश बडवे, प्रा. दासू वैद्य व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.प्राचार्य जब्दे पुढे म्हणाले, काळाच्या वेगाबरोबर तंत्रज्ञान व संकल्पना बदलत आहेत. या बदलासह विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांनी अद्ययावत असायला हवे. आपल्यामध्ये सुधारणा होण्यासाठी आपल्यातील न्यूनपणा सोडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाबरोबरच वास्तवातील अनुभव महत्त्वाचा असतो. तर अध्यक्षीय समारोप करताना प्रा. बडवे म्हणाले, मराठीच्या विद्याथ्र्यांना संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणकीय ज्ञानामुळे विविध संधी उपलब्ध होउै शकतात. शिवाय मराठी लेखक जगभर उपलब्ध व्हावे या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. याप्रसंगी डॉ. धर्मराज वीर यांनी मनोगत व्यक्त केले. तर राज्य मराठी विकास संस्थेचे सुरेश खोले व डॉ. दिलीप बिरूटे यांनी विकिपीडियाविषयी मार्गदर्शन केले. कार्यकमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. सूत्रसंचालन रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर मोहन बाभुळगावकर यांनी आभार मानले. या कार्यशाळेत कथाकार गेणू शिंदे, डॉ. मोहन सौंदर्य यांच्यासह 56 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले.मराठी विभाग व राज्य मराठी विकास संस्था आयोजित मराठी विकिपीडियाविषयक जागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सुरेश खोले, डॉ. दिलीप बिरूटे, ग्ंरथपाल डॉ. धर्मराज वीर, विभागप्रमुख प्रा. सतीश बडवे, प्रा. दासू वैद्य व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे आदी उपस्थित होते.
