Breaking News

अत्याचार करणार्‍या चौघाना वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा




नाशिक, दि.21   : भावासाठी शेतात जेवणाचा डबा देण्यासाठी जाणार्या अल्पवयीन युवतीचा रस्ता अडवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणार्या दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथील चौघांना  जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी गुरुवारी (दि. 19) प्रत्येकी वीस वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अवघ्या दहा महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला आहे.

बाळू सुकदेव डोंगारे (वय 19, रा. सोनगाव), पोपट किसन रहिरे (वय 28), रामदास कचरू लिलके (वय 32) व श्रावण काशीनाथ लिलके (वय 25), तिघे रा. कोचरगाव, ता. दिंडोरी अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथे 20 मार्च 2016 रोजी ही घटना घडली होती.
पीडित अल्पवयीन मुलगी शेतामध्ये भावासाठी जेवणाचा डबा घेऊन जात होती. त्यावेळी आरोपी रामदास लिलकेने वाटेमध्ये तिला अडविले  व  बळजबरीने उचलून नजिकच्या झाडीमध्ये नेले होते. त्याठिकाणी रामदास लिलके, पोपट रहिरे व बाळू डोंगारे यांनी तिच्यावर अत्याचार केला. तर श्रावण लिलकेने तिला, कोणाला काही सांगितल्यास पुन्हा असेच करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दिंडोरी पोलिसांत बलात्कारासह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी घटनेचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र

दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी सहा साक्षीदार तपासले.