Breaking News

एच -1 बी व्हिसासंदर्भातील विधेयक सिनेटमध्ये सादर होणार




वॉशिंग्टन, दि.21  : अमेरिकेच्या विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना एच -1 बी व्हिसा साठी प्रथम प्राधान्य मिळावे, यासंबंधीचे विधेयक सिनेटमध्ये सादर करण्यात येणार आहे. सिनेटमधील वरिष्ठ सभागृहातील सदस्य चक ग्रैसले आणि डिक डर्बन यांनी ही माहिती दिली आहे.
ज्या परदेशी नागरिकांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. अशा नागरिकांना येथील आयटी क्षेत्रात नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे,असे एच -1 बी मध्ये नमूद केले आहे. यावेळी परदेशी नागरिकांना कमी कालावधीसाठी व्हिसा मिळाविण्यासंदर्भात नवा कायदा करण्याच्या प्रस्ताव मांडण्याविषयी सांगणार असल्याचेही ते म्हणाले. जे नागरिक अमेरिकेच्या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत,अशाच नागरिकांना अमेरिकेतील आयटी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येते. अमेरिकेकडून एच -1 बी व्हिसा देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचाच अर्थ अमेरिकेच्या विद्यापीठात शिक्षण घेतल्यास येथील आयटी कंपन्यांमध्ये परदेशी

नागरिकांनाही प्रथम प्राधान्य देण्यात येईल.