Breaking News

मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांना साडेपाच कोटींचा दंड

मुंबई, दि. 14 - मुंबई मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी नकार दिला आहे.  अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी आयोजकांना या प्रकरणी नोटीस पाठवली असून जाहिरात शुल्क, भू-वापर शुल्क व सुरक्षा ठेव याकरता  24 तासांत पाच कोटी 48 लाख 30 हजार 643 रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. मॅरेथॉन हा सामाजिक उपक्रम नसून व्यावसायिक हेतूने चालवला जात  असल्याचे महापालिकेने नोटिसीत म्हटले आहे.
मॅरेथॉनचे आयोजक व संयोजक मे. प्रोकॅम इंटरनॅशनल लिमिटेड यांना ही नोटीस देण्यात आली आहे. ही रक्कम न भरल्यास संबंधित आयोजकांवर विद्रुपीकरण व  अनधिकृतपणे जाहिरात फलक व अन्य बाबी करण्याबाबत संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार खटला दाखल केला जाईल, असेही दिघावकर यांनी सांगितले.