आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत शिकत राहा
। लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांचे मत
आजची शिक्षणपध्दतीत विद्यार्थी फक्त शिक्षण घेण्याला प्राधान्य देत आहेत. सखोल ज्ञान मिळविण्यापेक्षा परिक्षेला महत्व दिले जाते. आजची शिक्षणपध्दतीत परिक्षा केंद्रस्थानी झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी फक्त पदवी घेण्यास प्राधान्य देतात. प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास होतोच असे नाही. विद्यार्थीही फक्त परिक्षेला केंद्रस्थानी ठेऊन पदवी मिळवितात. पदवी मिळाल्यानंतर प्रत्येकाला नोकरी मिळतेच असे नाही.अहमदनगर, दि. 31 - पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. पदवी मिळाल्याने किंवा शिक्षण घेतल्याने सर्वांनाच नोकरी मिळत नाही. ज्यांना नोकरी मिळत नाही, त्यांनी निराश न होता व्यवसाय करावा. प्रत्येकाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत शिकत राहिले पाहिजे. अन प्रत्येक बाबीतल्या मूळापर्यत पोहोचले पाहिजे, असे मत लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले. ते अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजमध्ये पदवीदान समारंभात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे होते. यावेळी रा.ह.दरे, जी.के.पाटील, चंद्रकांत म्हस्के, अरुणाताई काळे, प्राचार्य बी.एच. झावरे, प्राचार्य आर.एस. देशपांडे, प्राचार्य ए.एस. राजू, प्राचार्य सुरेश बाबर, एम.डी. कुलकर्णी, बी.एच. झावरे, उपप्राचार्य एस.एस. जाधव, एम.व्ही गिते , आर.जी.कोल्हे, दिलिप भिसे उपस्थित होते.
डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले, आजची शिक्षणपध्दतीत विद्यार्थी फक्त शिक्षण घेण्याला प्राधान्य देत आहेत. सखोल ज्ञान मिळविण्यापेक्षा परिक्षेला महत्व दिले जाते. आजची शिक्षणपध्दतीत परिक्षा केंद्रस्थानी झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी फक्त पदवी घेण्यास प्राधान्य देतात. प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास होतोच असे नाही. विद्यार्थीही फक्त परिक्षेला केंद्रस्थानी ठेऊन पदवी मिळवितात. पदवी मिळाल्यानंतर प्रत्येकाला नोकरी मिळतेच असे नाही. अनेकांना नोकरी मिळतही नाही. ज्यांना नोकरी मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी व्यवसाय करणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथे सखोल अभ्यास केला पाहिजे. आजचे शिक्षण सर्वव्यापी राहिलेले नाही. विभक्त पध्दतीचे शिक्षण झाल्याने परिणामकारक विकास होत नाही. शिक्षणाच्या विविध शाखा निर्माण झाल्या आहेत. मात्र या शाखा एकमेंकाशी संलग्न असल्या पाहिजेत. या सर्व शाखा जेव्हा एकमेंकाशी संलग्न होतील तेव्हाच कलामांना अपेक्षित असलेला भारत निर्माण होईल, असेही डॉ. निमसे म्हणाले.
