Breaking News

गणेश जयंतीनिमित्त एकदंत गणेश मंडळाच्या 102 युवकांचे रक्तदान

। कार्यक्रमाचे उद्घाटन बेडेकर यांच्या हस्ते 

अहमदनगर, दि. 29 - सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोज करण्यात आले. या शिबीराचे व कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीकांत  बेडेकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन इंजि.सतिष पागा, सौ.अंजली देवकर- वल्लाकट्टी, डॉ.दिलीप दाणे,श्री, गारदे अनंत, नानू  वल्लाकट्टी आदी उपस्थित होते.  या रक्तदान शिबीरामध्ये 102 युवकांनी रक्दातन केले. 
यावेळी श्रीकांत बेडेकर सर म्हणाले कि, एकदंत कॉलनीतील बहुसंख्य समाज हा पद्मशाली समाज असून हा समाज मी माझ्या लहानपणापासून पहात आहे. 1955  पासून हातमाग उद्योग, बिडी व्यवसाय करुन उपजीवीका करत होता कालानुरुप अनेक स्थित्यंत्तरे आली तरी ही हा समाज हार न मानता, टेलरिंग, कापड  बाजार, मेडीकल, सेल्समन शीप असे पडेल ते काम करुन आपली उपजीवीका करत आहे, अश्या प्रकारे हा समाज अतिशय प्रामाणिक, कष्टकरी, होतकरु व  मेहनती आहे. अतिशय गरिबीतून काम, शिक्षण पूर्ण करुन आज या समाजाची तिसरी पिढी सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत आहे. या पिढीतील युवकांनी अश्या  प्रकारे अतिशय चांगले काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.
सौ.अंजली वल्लाकट्टी यांनी सर्व महिलांना आत्मसंरक्षण  करण्यासाठी सज्ज राहण्याचे धडे दिले व एक महिला, डॉक्टर बनते, इंजिनिअर बनते, पंतप्रधान बनते,  राष्ट्रपती बनते तर मग पैलवान का बनू शकत नाही ? म्हणून मी स्वत: भारतातील पहिली महिला कुस्तीगीर व पहिली महिला कुस्तीगीर प्रशिक्षण बनले. तसे  आपण सर्वांनी व्यायाम करावा, असे त्या म्हणाल्या.
 रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी जीवन दान देतो.यांचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन एकदा करावे. रक्त हे  कोणत्या फॅक्टरीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणाला तरी रक्तदान करावेच लागते. युवकांनी रक्तदान चळवळीत उर्त्फुतपणे सहभाग घेतल्यास रक्ताचा  तुटवडा भासणार नाही, असे प्रतिपादन दिलीप दाणे यांनी केले. धार्मिक कार्यक्रमा बरोबरच मंडळाने सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत. यंदा रक्तदान शिबीरात  एकदंत गणेश मंडळाच्या 102 युवकांनी उर्त्फुतपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी  सहभाग घेतला. यावेळी 200 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.  या शिबीराला अष्टविनाक ब्लड बँकेचे  सहकार्य लाभले.  या कार्यक्रम  यशस्वीतेसाठी  एकदंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.