उद्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन
बुलडाणा, दि. 22 - अखिल विश्वाचे शौयप्रतिक छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. मागील वर्षी बुलडाणेकरांनी पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद विसरून भव्य-दिव्य शिवजयंती साजरी करीत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. 386 व्या जयंतीनिमित्त छत्रपति शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील 386 जणांचे पथसंचलन, रायगडाची माती आणि सिंदखेडराजा राजवाड्यावरून आणलेल्या ज्योतीने महाराजांना मानवंदना तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी मागील वर्षीची शिवजयंती गाजली होती. प्रा. प्रदीप साळुंके यांचे स्फूर्तिदायी भाषण आणि दुसर्या दिवशीच्या रॅलीत स्वंयस्फूर्तिने सहभागी झालेला समाजवर्ग हे सुद्धा एक वेगळे वैशिष्ट्य या शिवजयंतीचे होते.
महाराजांच्या विचारसरणीला अनुसरून आणि सामाजिक दृष्टीकोण जपणार्या या शिवजयंतीने एक नवीन पायंडा पाडला आहे. त्याच धर्तीवर याही वर्षीची शिवजयंती व्हावी, या उद्देश्याने उद्या, रविवार, 22 जानेवारी 2017 रोजी दुपारी 12 वाजता एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक बसस्टॅण्डजवळ पत्रकार भवन येथे होत आहे.
या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव 2017 चे गठन तसेच नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यावर्षीची शिवजयंती वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कशी करता येईल, यावरही विस्तृत चर्चा सदर बैठकीत केली जाणार आहे. म्हणून मागील वर्षीच्या सर्व पदाधिकारी तसेच समस्त शिवप्रेमींनी या बैठकीत उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2016 चे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत आणि सचिव सुनिल सपकाळ यांनी केले आहे.