चौंडी सेवा सोसायटी पालकमंत्री राम शिंदेंच्या ताब्यात
अहमदनगर, दि. 31 - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील चौंडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांच्याच गटाचा विजय झाला असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या विजयाची सुरूवात असल्याचे बोलले जाते राजकीय दृष्टया महत्वाच्या असणारी चौंडी सेवा सोसायटीत सर्व तेरा जागा स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाने जिंकत एक हाती सत्ता घेतली आहे. चौंडी विविध कार्यकारी सेवा संस्थेवर विलास जगदाळे यांची सत्ता होती. मात्र मध्यंतरी संस्थेमध्ये राजकीय वाद झाला हा वाद न्यायालयात गेला तेव्हापासून संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती या निवडणुकीत पणन महामंडळाचे संचालक पांडूरंग उबाळे यांनी शेतकरी विकास सहकारी मंडळाचे नेतृत्व केले होते व विलास जगदाळे विलास लोखंडे अप्पासाहेब उबाळे संतोष कोकाटे यांनी स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व केले होते सरळ लढत होऊन तेरा जागांसाठी मतदान झाले यामध्ये पांडुरंग उबाळे यांच्या मंडळाला एकही जागा जिंकता आली नाही यावरून उंटावरून शेळ्या हाकणारे पांडूरंग उबाळे यांना जनमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे विजयानंतर विलास जगदाळे यांनी सांगितले की चौंडी सेवा सोसायटीत पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का असी चर्चा सुरू केली होती परंतु ती चर्चा चुकीची असून गावपातळीवर गटतट आहेत मात्र आम्ही आज विजयी झालेले सर्व पालकमंत्री ना राम शिंदे यांचेच समर्थक आहोत पुढे ना राम याच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहोत असे दैनिक लोकमंथनशी बोलताना सांगितले विजयी झालेले व त्यांना मिळालेली मते अशी विलास आजिनाथ जगदाळे 265,आप्पासाहेब विठ्ठल उबाळे 275,संतोष कोकाटे 253,रवींद्र राजपुत252, दत्तात्रय भांडवलवर 249,किसन तेरकर 242,आजिनाथ बाबू खरात 240,मौलाली शेख 233,दत्तात्रय मोरे270, शामल इंगळे 264,शकुंतला भांडवलकर 260,महादेव शिंदे 276,आजिनाथ खरात 240. अशी मते मिळाली आहेत तसेच विजयी उमेदवारांचे ना राम शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.न्यायालयीन प्रक्रिया व प्रशासक नेमणुकीनंतर या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेटके यांनी काम पाहिले.
