मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी नरेंद्र पोयाम निवडणूक निरीक्षक
औरंगाबाद, दि. 20 - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून पुणे येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम यांची नियुक्ती केली आहे. श्री. पोयाम हे या निवडणूक कामासाठी औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृह येथे उपलब्ध आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक- 9881944159 असा आहे. या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत काही तक्रार असल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील निवडणूक विभागाने कळविले आहे.
