वंचित, उपेक्षित सातशे मुलांना केअर फॉर यू फौन्डेशनने दिला दंगल सिनेमाचा आनंद
अहमदनगर, दि. 19 - नगर मधील केअर फॉर यू फौन्डेशन नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असते , यावेळेस नगरमधील विविध संस्थांमधील सातशे मुलांना प्रबोधनात्मक व अनुकरणीय असा दंगल सिनेमा मोफत दाखविण्यात आला असल्याची माहिती या प्रोजेक्टचे प्रमुख प्रियंका बठेजा यांनी दिली
शहरातील रिमांड होम, बालभवन, स्नेहालय, युवान,सावली, यातिमखाना, क्लेराब्रूस वसतिगृह , बाबावाडी ,रामकरण सारडा विद्यार्थिगृह आदि ठिकाणच्या सुमारे सातशे मुले -मुलीनी या सिनेमाचा आनंद घेतला तर मध्यंतरात मुलांना अल्पोपहार देण्यात आला.
या उपक्रमास अनेकांचे सहकार्य व दानशूरांनी मदत केली , स्वतंत्र शो साठी महेश मंदिराने सवलत सिनेमागृह उपलब्ध करून दिले तर सहकार्य करणारापैकी चेतन बोगावात यांनी उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले.
सिनेमा पाहून मुलांना आनंद झाला व प्रेरणा मिळाली आमचे भविष्य घडविण्यासाठी केअर फॉर यू जे उपक्रम राबविते त्याबद्दल मुलांनी कृतन्यता व्यक्त करून मोठे झाल्यावर हा समाज सेवाचा वसा आम्ही राबवू असे सांगितले केअर फॉर यू ला 80 जी अन्वये देणगी दारणा कारमध्ये सवलत मिळत आहे गेली दहा वर्ष संस्था लहान मुले व वृध्दा साठी विविध उपक्रम राबवित असून यामध्ये लोणावळा येथील ऍडलॅब्स इमॅजिका , शिर्डी वाटर पार्क , बिगबाजार आदी ठिकाणी नेऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अनाथ, अंध, अपंगांबरोबरच नगरच्या मातोश्री, फिरोदिया ट्रस्ट,गोकुळधाम वृद्धाश्रमातील वृद्ध, ज्येष्ठांसाठी संस्थेतर्फे गर्भगिरी दर्शन, पैठण सहल,पंढरपूर, त्र्येबेकेश्वर आदि विविध ठिकाणी त्यांना नेण्यात आलेले आहे व त्यातून त्यांना आपले पणाची भावना निर्माण होऊन आनंद मिळाला आहे .