भारतात गुंतवणुकीसाठी हिच योग्य वेळ - नितीन गडकरी
दावोस, दि. 19 - भारतात गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. ते येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत जागतिक उद्योगपतींना संबोधित करत होते.
भारतात व्यापक स्तरावर रस्ते निर्मितीच्या योजना राबवल्या जात आहेत. भूमी अधिग्रहण व पर्यावरणाशी संबंधित मंजुरीतील अडचणी राहिलेल्या नाहीत. बंदर भागाचा विकास जलदगतीने केला जात आहे. देशात जहाज पर्यटनावरही लक्ष्य दिले जात आहे. आंतरदेशीय जलमार्ग हे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे आणि गंगा नदीत या अनुषंगाने कामे सुरू झाली आहेत, असेही गडकरी म्हणाले.