धोनीची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही: विराट कोहली
मुंबई, दि. 08 - ‘महेंद्रसिहं धोनीची कधीच कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो माझ्यासाठी कायमच कर्णधार असेल.’ अशा शब्दात विराटनं धोनीबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ‘टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं धोनीचे आभार मानले आहेत. आजवर मला संघाबाहेर जाण्यापासून धोनीनं अनेकदा वाचवलं आहे.’ असंही विराट म्हणाला. 2008 साली श्रीलंकेत वनडेमध्ये विराटनं पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो कायमच धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत राहिला. सुरुवातीच्या काळात कोहली चांगलं प्रदर्शन करु शकला नव्हता. पण त्यावेळी धोनीनं त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवून त्याला संघात स्थान दिलं होतं.
बीसीसीआय टीव्हीनुसार, कोहली म्हणाला की, ‘धोनी अशी व्यक्ती आहे की, जो माझा मार्गदर्शक होता. ज्यानं मला कायमच संधी दिली. एक क्रिकेटर म्हणून मला त्यांनी योग्य तो वेळ दिला. अनेकदा मला संघातून बाहेर जाण्यापासून त्यानं वाचवलं. कर्णधार म्हणून धोनीची जागा घेणं फार कठीण गोष्ट आहे.’ असंही विराट म्हणाला. ‘धोनीची जागा घेणं ही फार कठीण गोष्ट आहे. धोनीची इतर कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो माझ्यासाठी कायमच कर्णधार राहील.’ असं विराट म्हणाला. धोनीनं बुधवारी आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विराट कोहलीला टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.