राष्ट्रवादीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीस प्रारंभ
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रणांगण ऐन थंडीत तापू लागले आहे. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची पूर्वपरीक्षा सोमवारपासून येथील राष्ट्रवादी भवनात सुरू झाली. पक्षाकडून मुलाखतीचा कार्यक्रम धडाक्यात राबवण्यात येत असून पहिल्या दिवशी फलटण, खंडाळा, महाबळेश्वर व वाई तालुक्यांतील गट व गणांमधील एकूण 211 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीसाठी अनेक इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी द्या, असा आग्रह मुलाखतकर्त्यांसमोर धरला.
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांत इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. सुमारे दीड हजारहून अधिक इच्छुकांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यासाठी भरमसाठ फी आकारली तरीही अनेकांनी उमेदवारीची दावेदारी सोडली नाही. अर्ज भरलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींना सोमवारपासून राष्ट्रवादी भवनात प्रारंभ झाला. दिवसभरात फलटण तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटासाठी 28, 14 गणांसाठी 71, खंडाळ्यातून 28, वाईतून 7, महाबळेश्वरमधून 14 अशा 211 इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.
सकाळी 10 वाजल्यापासून तालुकानिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या. राष्ट्रवादी भवनच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी आ. प्रभाकर घार्गे, पक्षनिरीक्षक सुरेशराव घुले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, अॅड. नितीन भोसले, सर्व सेलचे अध्यक्ष व अन्य पदाधिकार्यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात येत होत्या.
मुलाखतीवेळी प्रत्येक उमेदवाराला समोर बसवून त्यांच्याकडून राजकीय व सामाजिक वाटचालीची माहिती घेतली जात होती. निवडणूक लढवण्यामागची भूमिका, गट व गणातील गावे, पक्षासाठी दिलेले योगदान, राबवलेले विविध उपक्रम याबाबतची इत्यंभूत माहिती राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून घेतली जात होती.
इच्छुकांची नावे गट व गणनिहाय पुकारली जात होती. त्यानुसार इच्छुक मुलाखतकर्त्यांसमोर जाऊन आपली बाजू मांडत होते. मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.