डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी संपन्न
वॉशिंगटन, दि.21 : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ही आपली नव्हे, तर जनतेची सत्ता असेल, असे ट्रम्प यांनी बोलताना सांगितले.
या सोहळ्यासाठी मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा, माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिटंन, हिलेरी क्लिटंन यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी रात्रीच कुटुंबासह वॉशिंगटनमध्ये दाखल झाले होते. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोष करण्यात आला. या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे आठ लाख लोक उपस्थित होते, असा दावा करण्यात आला आहे.शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वॉशिंगटनला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
