Breaking News

‘ओबामा केअर’ कायदा रद्द ! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय



     


वॉशिंग्टन, दि.21 : अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वसामान्यांना परवडणारा ‘ओबामा केअर’ कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या केल्याभारतीय वेळेनुसार काल रात्री शपथ घेतल्यानंतर ट्रम्प ओव्हल कार्यालयात आले. ओबामा यांचे नाव काढून तेथे हेल्थ केअर कायदा लागू करण्याच्या बाजूने आपण आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्यानंतर व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ भरस प्रिबस यांनी सर्व सरकारी संस्था व विभागांना आदेश जारी केले आहेत. यामध्ये ओबामा केअर कायद्याला तूर्तास स्थगिती देण्यास सांगितले आहे.