Breaking News

ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी होणार?

मुंबई, दि. 07 - प्रख्यात अभिनेते ओम पुरी यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 66 वर्षाचे होते. मात्र ओम पुरी यांच्या मृत्यूची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी ओम पुरी यांच्या घराचा पंचनामा केला. प्राथमिकदृष्ट्या ओम पुरी यांच्या मृत्यू नैसर्गिक वाटत आहे. परंतु सुत्रांच्या माहितीनुसार, पुरी यांच्या डोक्याच्या मागे दुखापत झाली आहे. ही दुखापत पडल्यामुळे झाली असेल किंवा कोणीतरी मारल्यामुळे. ओम पुरी अतिशय मद्यपान करत असंत. कालही त्यांनी मद्यपान केलं होतं. त्यांच्या घरात दारुच्या बाटल्या मिळाल्या होत्या. आम्ही सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करणार आहोत. येणार्‍या-जाणार्‍यांचीही चौकशी होणार आहे. गरज पडल्यास पत्नी नंदिता पुरी यांचीही चौकशी केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं.