भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र याव्यात
सांगली, दि. 18 - काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची आमची तयारी असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांच्याशी येत्या दोन दिवसात चर्चा होईल. चर्चेपर्यंतची तयारी झाल्याने, आता 10 टक्के सूर जुळले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली
ते म्हणाले की, राष्ट्रवादीने इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पुढील आठवड्यापासून आयोजित केला आहे. त्यापूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांशी आम्ही आघाडीबाबत चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीच तशी सूचना आम्हांला दिली होती. त्यामुळे चर्चेला सुरुवात होईल, आम्ही आशावादी आहोत. शिराळा तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय जवळपास जाला आहे. काँग्रेसच्या सत्यजित देशमुखांनी तसा प्रस्तावही दिलेला आहे. वाळवा तालुक्यातील गावांमध्येही आघाडी व्हावी, अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाने यापूर्वी केली होती. काँग्रेसने राष्ट्रवादीवर टीका केली असली तरी, त्याबद्दल आमची तक्रार नाही. भाजप, शिरसेनेला जिल्हा परिषदेतील सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्रित आले पाहिजे.
जागावाटपात आम्ही अवास्तव मागणी करणार नाही. गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादीचे काही नेते अन्य पक्षांत गेले आहेत. यामध्ये खासदार संजयकाका पाटील, विलासराव जगताप, अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख यांचा समावेश आहे. या नेत्यांबरोबर जे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीतून बाजूला झाले आहेत. त्याचाह विचार जागावाटपाच्या चर्चेवेळी होईल. अवास्तव मागणी करुन चर्चा फिसकटणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची तयारी आहे. आम्ही आघाडीबाबत आशावादी आहोत. काही ठिकाणचा अपवाद वगळून आघाडी करण्याचाही प्रस्ताव चर्चेला येऊ शकतो. याबाबत बैठकीनंतरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सागर घोडके, वैभव शिंदे उपस्थित होते.
घोरपडे आमच्यासोबत ः अजितराव घोरपडे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाची कोणतीही चर्चा झालेली नाही. तरीही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीसोबतच राहण्याची चिन्हे आहेत, असेही शिंदे म्हणाले.
मुलाखतींचा कार्यक्रम ः राष्ट्रवादीतर्फे 21 ते 23 जानेवारी या कालावधीत इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सांगलीतील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात होणार आहे. मिरज तालुका पश्चिम व उत्तर भाग, पलूस व कडेगाव, तसेच तासगाव तालुक्यासाठी 21 जानेवारीस, तसेच कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, वाळवा तालुक्यासाठी 22 रोजी, तर शिराळा, जत, मिरज पूर्व भागासाठी 23 जानेवारीस मुलाखती होतील.