Breaking News

प्रजासत्ताक दिनी ड्रायडेला दारु विक्री, 6 जणास अटक

प सांगली, दि. 28 - प्रजासत्ताकदिनी ड्राय डे जाहीर असताना, बेकायदा देशी व विदेची दारुची विक्री करणार्‍या सहाजणांना अटक करण्यात आली आहे.  जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. 21 हजाराचा दारुसाठा जप्त केला. जुना बुधगांव रस्त्यावर वाल्मिकी आवासमध्ये रमा उर्फ  जयश्री अशोक बाटुंगे हिला हातभट्टीची दारु विकताना पकडले. तिच्याकडून 70 लिटर दारु व अन्य साहित्य असा चार हजाराचा माल जप्त केला. इटकरे (ता.  वाळवा) येथे मुबारक बाळू मुलाणी (वय 40) यास अटक करुन एकवीसशे रुपयांचा देशी दारु साठा जप्त केला. सांडगेवाडी (ता. पलूस) येथे विजय वसंत सांडगे  (27) यास अटक करुन पाचशे रुपयांची देशी दारु, तसेच बेंद्री (ता. तासगांव) येथे राजू कोळी याच्याकडून साडेसातशे रुपयांची देशी दारु जप्त केली. येळावी  (ता. तासगांव) येथे उत्तम रंगराव जाधव (46) याच्याकडून 12 हजार 760 रुपयांचा दारुसाठा, सागाव (ता. शिराळा) येथे दादू पांडुरंग जरग (29) याच्याकडून  तेराशे रुपयांची दारु जप्त केली.