Breaking News

हिराखंड एक्स्प्रेस अपघातातील मृतांची संख्या 32 वर

कुनेरु (आंध्र प्रदेश), दि. 22 - ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्‍वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले आहेत. जगदलपूरहून भुवनेश्‍वरच्या दिशेने जाताना रात्री 11 वाजताच्या सुमारास हिराखंड एक्स्प्रेसचा अपघात झाला. या अपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार, असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा केली आहे.
प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून डबे हटवण्याचं काम सुरु आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलवण्यात आले आहेत.
जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार मिळावा म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्रालयातील संबंधिक अधिकारी आणि स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे या सर्व घटनेचे अपडेट घेऊन आहेत. दरम्यान, कुनेरु हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, या घटनेमागे नक्षलवाद्यांचा काही हात आहे का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.