3 ते 5 मार्चदरम्यान रंगणार लोणार महोत्सव
बुलडाणा, दि. 29 - जगप्रसिध्द खार्या पाण्याचे सरोवर असलेले लोणार शहरात शासनाचे वतीने 3 ते 5 मार्च दरम्यान लोणार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात आपल्या परिसरातील कलावंतांना आपली लोककला सादर करण्याची संधी मिळणार असल्याचे कलावंतासह या महोत्सवाला आगळे वेगळे रुप देण्याचे आवाहन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केले आहे.
जगप्रसिध्द अ दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या लोणार सह शेगाव व सिंदखेड राजा सारख्या पर्यटन केंद्राच्या विकासाच्या निमित्ताने राज्य शासनाने लोणार महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी लोणारला लोणार महोत्सव व त्यानंतर लोणार लोकोत्सव शासनाकडून साजरा करण्यात आला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात राहणार आहे. स्थानिक कलावतांनाही या मध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती तहसीलदार कव्हळे यांनी दिली आहे.
जागतिक किर्तीच्या लोणार सरोवराचा विकास व्हावा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने लोणार सरोवराचा प्रचार व प्रसार व्हावा आणि सरोवराचे नावलौकिक व्हावे, या उद्देशाने स्थानिक नागरिकांनी लोणार महोत्सव सुरु केला होता. पहिल्या वर्षी नागरिकांनी लोकसहभागातून महोत्सव साजरा केला तर लोकरेट्यामुळे दुसर्या वर्षी प्रशासनाने हा महोत्सव साजरा केला होता. परंतु त्यानंतर हा महोत्सव बंद पडला होता. दरम्यान नागरिकांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर शासनाने महोत्सवास मंजुरी दिली असल्याने आता मार्च 2017 मध्ये तब्बल दहा वर्षानंतर हा महोत्सव होऊ घातला आहे. 3 ते 5 मार्च दरम्यान हा महोत्सव घेतला जाणार आहे. प्रशासनाच्या वतीने महोत्सवाची जय्यत तयारी केली जात आहे. वासुदेव, गोंधळ, भारूडा सारख्या पारंपारीक लोककला देखील या महोत्सवात सादर केल्या जाणार आहे. यासह इतरही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शिवाय प्रामुख्याने बचतगटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकलेतील वस्तू व घरघुती वापरातील साहित्यांचे स्टॉल देखील या महोत्सवात लागणार आहेत. या माहोत्सवामध्ये सहभागी होणार्या परदेशी पर्यटकांना देशी खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येणार आहे. याकरीता नागरीकांनीही सहभाग नोंदवून जगाच्या कानाकोपर्यात पोहचविण्याचे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.