Breaking News

सीरियात आत्मघातकी बॉम्बस्फोट, 10 जण ठार

दमास्कस, दि. 13 - सीरियाची राजधानी दमास्कसमधील कफारसुसेह भागात आत्मघातकी बॉम्बस्फोट होऊन 10 जण ठार  तर 17 जण जखमी झाले आहेत. कफारसुसेहमधील मुहाफजा क्रीडा क्लबजवळ दोन आत्मघातकी हल्लेखोरांकडून स्फोट करण्यात आला. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.