Breaking News

दोन दिवसीय आदिवासी वसतीगृह स्नेहसंमेलन 18 जानेवारीला

पुणे, दि. 16 - आदिवासी विकास विभाग नाशिक, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  घोडेगाव ता.आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यामाने दोन दिवसीय आदिवासी वसतीगृह कार्यशाळा व स्नेहसंमेलन येत्या गुरुवारी (दि.18) आयोजिक करण्यात आले  आहे. 
हे स्नेहसंमेलन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा सभागृह, सारसबाग रोड येथे घेण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महापालिका महापौर प्रशांत  जगताप यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता होणार आहे. यानंतर कॉ. कुमार शिराळकर, सतीश पेंदाम मार्गदर्शन करतील.
 यावेळी पिंपरी-चिंचवड महापौर शकुंतला धराडे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त नरेंद्र पोयाम, विधानसभा सदस्य संतोष टारपे, पोलिस  उप-आयुक्त कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त योगिराज जाधव, पोलिस उपनिरिक्षक सुनिल वसावे, आदिवासी रानकवी तुकाराम धांडे, नगरसेविका रोहिणी  चिमटे, नगरसेविका आशा सुपे, अभियंता नामदेव गंभीरे, आदिवासी विद्यार्थी कार्यकर्ते भरत तळपाडे अरुण पारधी, जयवंत वानोळे, सतिश भांगरे,  कविता बरे,   आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विद्यार्थींचे वसतीगृहांचे गृहपाल व आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृहातील विद्यार्थींनीनी  केले आहे.