Breaking News

सौरव गांगुली यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा ?

नवी दिल्ली, दि. 04 - खा. अनुराग ठाकूर यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारताचा माजी कर्णधार व बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली याचे नाव आघाडीवर आहे. 15 जानेवारीनंतर भारत व इंग्लंड दरम्यान होणा-या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष टी.सी. मॅथ्यू व गौतम रॉय यांचीही नावे आहेत. भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचा समावेश होतो.