Breaking News

हैदराबाद विमानतळावर 1.2 किलो सोनं जप्त, तस्करी करणारे तिघे अटकेत

हैदराबाद, दि. 01 - हैदराबादच्या विमानतळावर काल रात्री 1.2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याची तस्करी केली जात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे.
हैदराबादच्या विमानतळावरुन सोन्याची तस्करी होणार आहे, अशी माहिती एआययू अर्थातच हवाई गुप्तचर संघटनेला मिळाली होती. त्याप्रकारे सापळा रचून  जेद्दाहवरुन आलेल्या विमानातील मोहम्मद आमीर अहमद, मोहम्मद फासीउद्दीन आणि फहद याक खान यांना ताब्यात घेतलं आहे.
आयकर अधिकारी आणि एआययूनं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. यात तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे,  तसंच जप्त केलेल्या सोन्याची चौकशीही आयकर खात्यानं सुरु केलं आहे. नोटाबंदीनंतर देशभरात आयकरच्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर सोनं आणि नव्या नोटाही  जप्त करण्यात आल्या आहे.