Breaking News

अखिलेश समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

लखनऊ, दि. 01 - उत्तर प्रदेशच्या राजकारणात ‘यादवी’ माजली आहे. लखनऊमध्ये रामगोपाल यादव यांनी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन बोलावलं आणि त्यात अखिलेश यादव यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या अधिवेशनाला मुलायम सिंह अनुपस्थित होते. त्यामुळे अखिलेश गटाचं अधिवेशन असं या अधिवेशनाला रुप आलं होतं.
रामगोपाल यादव यांनी बोलावलेलं राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन पक्षविरोधी आहे, असं पत्रकाद्वारे मुलायमसिंह यांनी जाहीर केले. मात्र, या अधिवेशनातही  मुलायम सिंह यांच्या अनुपस्थिती मोठे निर्णय घेण्यात आले. या अधिवेशनाला अखिलेश यादव, रामगोपाल यादव, खासदार नरेश अगरवाल इत्यादी उपस्थित होते.
अधिवेशनात अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं, त्याचबरोबर शिवपाल यांना उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात  आला. इतकंच नव्हे, तर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांची मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली. याआधी मुलायम सिंह हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  होते. समाजवादी पक्षाचे सरचिटणी अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यादव कुटुंबातील वादाला अमर सिंह कारणीभूत असल्याचा अखिलेश  समर्थकांचा आरोप आहे. त्यामुळे अखिलेश समर्थकांचा अमर सिंह यांच्याविरोधात संताप आहे. अखेर आजच्या लखनऊमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी अमर  सिंह यांना पक्षातूनच बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.