गुजरातमध्ये पुन्हा नोटांचा पाऊस, भजनसंध्या कार्यक्रमात नोटांची उधळण
नवसारी, दि. 26 - संपूर्ण देशात सुट्या पैशांची चणचण भासत असताना लोक सुट्या पैशांसाठी दारोदोर भटकत असताना गुजरातमध्ये मात्र पुन्हा एकदा नोटांचा पाऊस पडला आहे. गुजरातमधील नवसारीत आयोजीत भजनसंध्या कार्यक्रमात कलाकारांवर अक्षरश: पैशाचा पाऊस पाडण्यात आला. गुर्जर समाजाच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात कलाकारांवर 10, 20,50 आणि 100 रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या.
गुर्जरांच्या समाज भवनासाठी या भजनसंध्येचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात कलाकार फरीदा मीर आणि मायाभाई आहिर यांच्यावर नोटांची यथेच्छ उधळण करण्यात आली.
गुर्जरांच्या समाज भवनासाठी या भजनसंध्येचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात कलाकार फरीदा मीर आणि मायाभाई आहिर यांच्यावर नोटांची यथेच्छ उधळण करण्यात आली.