रशियाच्या लष्करी विमानाला अपघात 92 प्रवाशांचा मृत्यू
सोची, दि. 26 - रशियाचं बेपत्ता लष्करी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 92 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
रशियातील ब्लॅक सीमध्ये हे विमान कोसळलं. रडारवरुन उड्डाण घेताच केवळ 20 मिनिटात हे विमान बेपत्ता झालं होतं. शोधमोहिमेनंतर समुद्रात या विमानाचे अवशेष आढळून आले. एका वृत्तसंस्थेने रशियन संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं होतं. आता मृत प्रवाशांचा समुद्रात शोध घेतला जात आहे. स्थानिक रिपोर्ट्सनुसार विमानात 82 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर होते. प्राथमिक माहितीनुसार हे लष्करी विमान दक्षिण रशियातील सोची येथून सीरियातील लटाकीया प्रांतात जात होतं.