जनतेला आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्याकरीता चिन्ह विरहीत निवडणूका घ्याव्यात
। जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 26 - भारतीय जनसंसद आणि संविधान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे राळेण सिध्दी येथे पुर्व पाकिस्तान स्वतंत्र करुन बांगलादेश निर्माण केला या विजय दिनी राज्यातील कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना पुढील आंदोलनाची दिशा या विषयी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले की, देशाला पक्ष आणि पार्टीकडून उज्वल भवितव्य मिळवण्याची शक्यता वाटत नाही. जर आपल्या देशाला उज्वल भवितव्य द्यायचे असेल तर त्याची चावी मतदार जनतेच्या हातता आहे. यापुढे प्रत्येक मतदाराने भारत मोर्चाचे शपथ घेऊन प्रतिज्ञा करेल की कोणत्याही पक्ष आणि पार्टीचा गुंड भ्रष्टाचारी लुटारु उमेदवार जो घटनाबाह्य आहेअशा उमेदवाराला मी माझे मत नोंदविणार नाही, मी संविधानाप्रमाणे जो पक्ष पार्टी विरहीत चारित्र्यशिल उमेदवार आहे अशा उमेदवारालाच माझे मत देईल. फक्त पक्ष आणि पार्टीची सत्ता बदलुन देशात परीवर्तन येणार नाही तर निवडणूकातील पक्ष आणि पार्ट्याचे चिन्ह हटवून फक्त उतेदवाराचे नाव व त्याचा फोटो बॅलट पेपरवर असेल. यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रचार प्रसार करुन मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी व याचबरोबर जनतेसाठी झिजणारे कार्यकर्ते उत्स्फुर्त पणे पुढे येऊन गावे व शहरे विकास कामाची जोड देऊन अदर्शवत उभी करावीत असे आवाहन केले.यावेळी ब्रिगेडीअर सुधीर सावंत, आमदार माजी कर्नल शेरावत, अॅड.पारकर, अशोक सब्बन आदिसह विविध ठिकाणावरुन आलेले कार्यकर्ते या कार्यशाळेला उपस्थित होते.
शासनाच्या योजना योग्य रितीने राबविण्यासाठी लाभार्थीमध्ये जागृती करावी. विशेषतः बेघरांसाठी घरकुल योजना, सर्व समान्य जनतेला, जगातील विकसित देशातील व्याजदराप्रमाणे 2 ते 3 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करावे, बड्या उद्योग पतीचे थकीत सात लाख कोटी रुपये वसुल होत नाहीत. तो पर्यंत सर्व सामान्य जनता कर्ज भरणार नाही, अशा आक्रमक भुमिका घेऊन आर्थिक आरिष्ठातून बाहेर पडण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले.
माजी खासदार ब्रि.सुधीर सावंत देशात चिन्ह विरहीत भूमिका जनतेला आवडत असून बिहारमध्ये मुख्यमंत्री नितेशकुमार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष विरहीत निवडणूका घेऊन या भुमिकेसाठी पाठींबा व्यक्त केला आहे, असे त्यांचे भेटीत मा.मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माहिती दिली. याकार्यशाळेत विविध विषयावर चर्चा होवून जनसंसदेचे काम वाढविण्यासाठी कार्यकर्ते आले होते.