सिलाई वर्ल्डचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
अहमदनगर, दि. 26 - सिलाई वर्ल्डने शहराच्या वैभवात भर पडली आहे. परिपुर्ण वस्त्र दालन असलेले सिलाई वर्ल्ड अल्पावधित चोखंदळ नगरकरांच्या पसंतीस उतरले असून, या भव्य शोरुममुळे शहरातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर हाजी नजीर शेख यांनी केले.
सर्जेपुरा येथील सिलाई वर्ल्डच्या दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हाजी नजीर बोलत होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हाजी नजीर यांचे मातोश्री हाजी हमिदा शेख यांच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला. यावेळी अन्वर शेख, स्टोअर मॅनेजर सागर बोबडे, राकेश वाल्मिक आदिंसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिलाई वर्ल्डच्या ब्रॅण्डेड वस्त्रांना नगरकरांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. प्रत्येक सण व उत्सवाला असणार्या विविध योजनांचा लाभ नगरकरांना घेता येत असल्याचे सांगून स्टोअर मॅनेजर राकेश वाल्मिक यांनी ग्राहकांचे आभार मानले.