सामान्यांची पत पतसंस्थेने निर्माण करावी : अण्णा हजारे
अहमदनगर, दि. 26 - सामान्य लोकांची पत निर्माण करण्याच काम करताना पतसंस्थेला मोठी कसरत करावी लागली तरी हे सतिच वाणं आहे, ते व्रत अखंड ठेवून ही आर्थिक संस्था सक्षम ठेवावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी स्वर्णमाला दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना केले.
नगर येथील स्वर्णमाला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2017 ची नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशनात ते बोलत होते. पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब म्हस्के, सचिव सुदाम मडके, शुभतेज हेल्थकेअर सेंटरचे संचालक डॉ. दिलीप खोसे, राहुल ग्राफिक्सचे संचालक राहुल पासकंटी आदी उपस्थित होते.
स्वर्णमाला पतसंस्थेच्या दोन वर्षाच्या कालखंडात 15 कोटींच्या ठेवी असून कर्ज वाटप 9 कोटी व सुली 100 टक्के आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष म्हस्के यांनी अण्णा हजारे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना दिली. संचालक प्रा. पी. एम. साठे यांनी स्वागत केले. तर संसद आदर्शगाव कासारे (ता. पारनेर) चे सरपंच धोंडीभाऊ दातीर यांनी प्रास्ताविक केले.