’सांताक्लॉज युवी’ ! कर्करोगग्रस्त मुलांना युवराजकडून अनोखी भेट
मुंबई, दि. 24 - ख्रिसमसनिमित्त टीम इंडियाचा अष्टपैली खेळाडू युवराज सिंग याने मुंबईतील कर्कग्रस्त मुलांच्या चेहर्यावर आनंद फुलवला. युवराजनं मुंबईतल्या सेंट ज्यूड इंडिया चाईल्ड केअर सेंटरला भेट दिली आणि तिथल्या मुलांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या.
युवराजनं सर्वांसाठी टीशर्टही आणले होते. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या आधीच मिळालेल्या या गिफ्टमुळं मुलांच्या चेहर्यावर आनंद खुलला. युवराजनं स्वत: कॅन्सरवर मात करून पुन्हा मैदानात उतरण्याची हिंमत दाखवली होती. युवराज सिंग आपल्या ‘यूवीकॅन’ या संस्थेमार्फत तो कर्करोगग्रस्तांसाठी मदतकार्य करतो आहे. पुढील वर्षीही आपलं काम असंच सुरू ठेवण्याची इच्छा युवराजनं व्यक्त केली आहे.