संताची चळवळ भक्ती बरोबरच समाज जागृतीची ः डॉ.सय्यद
अहमदनगर, दि. 26 - पारनेर तालुक्यात कान्हूरपठार येथील व्यवहारे लॉन मध्ये आयोजित बहुजन समाज मेळाव्याचे मार्गदर्शक करताना डॉ रफीक सय्यद यांनीसांगितले की भाईरतीय संस्कृतीत संत परंपरा महान असून संताने समाजासाठी दिलेले योगदान श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा, तुकाराम बरोबरच संत गोरा कुंभार, पैगंबर हजरत मुहमद, रोहिदास महाराज, संत गाडगे महाराज,बसवणामहाराज, पेरीयाररामसामी नायकर, क्रांती ज्योती फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींचे समाजासाठी दिशा देऊन जागृती केली संतांच्या भक्तीचे आंदोलन समाज शोषणातून मुक्ती मिळविण्यासाठी होते.आजच्या काळात संतांनी व राष्ट्रपुरुषांनी दिलेल्या महान विचारांचा वारसा जतन करून त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाज संघटन करून एकत्र राहणे आजच्या काळाची गरज आहे.
अध्यक्षस्थानीखादी ग्रामोद्योग व्हा.चेअरमन राजेंद्र करंदीकर यांनी सांगितले की, आजच्या समाज संघटीत शक्तीची ताकद दाखवून दिली असून लोक प्रतीनिधींनी हारपत्करून संघटीत शक्तीचीताकत समजली असून आज मतांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक ओबीसी आरक्षण राजकारणात सक्रीय राहिला पाहिजे. प्रास्तविकात संत गोरोबा काका जन्मशताब्दी सोहळ्याचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्यात प्रारंभ करण्यात आला .मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्षगणेश नाना मंदिलकरयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीकुंभार समाज उन्नती मंडळ पुणेचे अध्यक्ष संतोष कुंभार, अहमदनगर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ गोरे व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रव्यापीबहुजन समाज जोडो अभियानांतर्गत संत शिरोमणी गोरोबा काका सप्तशताब्दी समाधी सोहळा व राष्ट्रसंत महाराज ,संत गाडगे महाराज , पेरियाररामसामीनायकर,पैगंबर हजरत मुहमद,क्रांती ज्योती, सावित्रीबाईफुले जयंती निमित्त आयोजित बहुजन समाज जागृती संमेलन व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कुंभार महासंघ पुणेचे ज्ञानेश्वर सोमवंशी,हेमंत खटावकर, खादी ग्रामोद्योग पारनेरचे चेअरमनहसनशेठ राजे ,राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष गंगाधर कोळेकर,महात्माफुले संत समता परिषदेचे अध्यक्षजालिंदर मेहेर,नाभिक समाज अध्यक्ष भाऊ बिडे,सुतार समाजाचे सुभाष शिंदे , सोनार अमोल मैड,सावता परिषदेचे गणेश रसाळ, राजूशेठशेख, जिल्हा बँकेचे संचालक मधुकर पठारे, बामसेफ प्रचारक बाळासाहेब पातारे,उमाजी नाईक संघटनेचे बाळासाहेब शिरतार,चर्मकार महासंघ अध्यक्ष दादाभाऊ ढवळे, सुरेश रोकडे, आदिवाशी परिषदेचे साहेबराव मधे, कुंभार समाज संघटक बबनराव गोरे सर ,पारनेर कुंभार समाज अध्यक्ष विठ्ठलराव मोरे ,आर.पी.आय.चे अमित जाधव,दलित महासंघाचे अंकुशराव राक्षे, निघोज अल्पसंख्यांक मंडळाचे उपाध्यक्ष भगवान भालेकर, मार्गदर्शक उमेश सोनवणे, इम्रान सय्यद,संतोष भालेकर,बाबाजी वाघमारे,ठकाराम गायखे,हिरामण सोनवणे,राजेंद्र सोनवणे,तुकाराम जाधव महाराज,अंगणवाडी सेविका अलका झरेकर,बबन श्रीमंदीलकर,पारनेर तालुक्यातील ओ.बी.सी.बंधू भगिनी मोठ्या संख्येनेउपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पातारे यांनी केले व आभार संत गोरोबा समितीचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी मानले.