एकजुटीने जि.प.वर भगवा फडकवा ः खा. प्रतापराव जाधव
बुलडाणा, दि. 26 - सामाजिक जीवनात, राजकारणात माग पाहुन चालणार नाही. पुढे जायच असेल तर पुढचा विचार करा. येणार्या पं.स. व जि.प.च्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या आहेत. याच कार्यकर्त्यांमुळे नेत्यांना मान सन्मान मिळतो. त्यामुळे आपसी मतभेद चार भिंतीच्या आत ठेवा. गट-तट दुर सारुन एकजुटीने काम करत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. येथील जन शिक्षण संस्थानच्या परिसरात बुलडाणा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आज 25 डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी खा. प्रतापराव जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, माजी आमदार विजयराज शिंदे, संजय गायकवाड, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सिंधुताई खेडेकर, प.स.सभापती सुधाकर आघाव, डॉ. मधुसूदन सावळे, पुरुषोत्तम नारखडे, पं.स.उपसभापती रामेश्वर पाटील, तालुका प्रमुख अर्जुन दांडगे, तालुका प्रमुख भोजराज पाटील, वाहतुक सेनेचे संजय हाडे यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी खा. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सर्वात जास्त ताकद शिवसेनेची आहे. गावपातळीपासून जिल्हा ते प्रमुखपदापर्यंत हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची बांधणी पध्दतशिरपणे केली आहे. जीवाला जीव देणारे शिवसैनिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायम तत्पर आहेत. लढवय्या शिवसैनिक निष्टेने निवडणूकीत भगव्याशी इमान राखुन काम करताहेत. याच कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी आपसी मतभेद बाजुला ठेवुन मान-पान नाट्य बाजुला सारत कार्यकर्त्यांच्या या निवडणूकीत त्यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहन केले. जे आपण पेरतो तेच उगवते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत पक्षाशी बेईमानी केली तर उद्या तुमच्या निवडणूकीत ते हिशोब चुकते करतील असे सांगुन भांडूून पक्ष मोठा होणार नाही. बेरजेचे राजकारण करा. भगवा खांद्यावर घेणारा कार्यकर्ता जोडून पक्षवाढीसाठी स्वत: अहंकार बाजुला ठेवा, असेही यावेळी ते म्हणाले.
जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले की, मिनीमंत्रालय असलेल्या जि.प.मध्ये सत्ता मिळाल्यास ग्रामीण भागातील सर्व सामान्यांना थेट लाभाच्या योजना राबविता येतात. शिवसैनिकांनी सुचविलेल्या उमेदवाराला तिकिट मिळणार आहे. शिवसेनेचा उमेदवार कोणताही चेहरा असो खरा उमेदवार हा धनुष्यबान आहे. त्यामुळे बुलडाणा तालुक्यातील जि.प.गटाच्या व पं.स. गणाच्या जागांवर भगवा फडकवणार असल्याचे सांगितले. जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांनी शिवसैनिकांनी निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी मतदार यादी पासुन अभ्यासपुर्ण तयारी करावी. ग्रामीण भागात शिवसेनेची पकड मजबुत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा भाजप हा आपला मित्रपक्ष शत्रुसारखा वागतोय. त्यामुळे त्यांना जागा दाखविण्यासाठी निवडणूका जिंगणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक जि.प. विरोधी पक्षनेते अशोक इंगळे यांनी केले.सुत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले. यावेळी शरद टेकाळे, बाळु नारखेडे, गणपत दांडगे, गजानन मुठ्ठे, अशोक गव्हाणे, उमेश कापुरे, वैशालीताई इंगळे, मिनाताई गायकवाड, विजय जायभाये, दिपक सोनुने, आशिष जाधव, बाळु धुड, निलेश राठोड, माणिकराव सावळे, प्रा.लहाने यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिकांची उपस्थिती होती.