Breaking News

अखिलेश आणि रामपाल यादवांचं निलंबन रद्द

लखनऊ, दि. 31 - उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातील यादवीत अखिलेश यादव यांची सरशी झाली आहे. कारण अवघ्या 12 तासात अखिलेश आणि रामगोपाल यांचं निलंबन मुलायम यांनी मागे घेतलं आहे. इतकंच नव्हे तर शिवपाल आणि अखिलेश या दोघांनीही जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्याही रद्द करण्यात आल्या  आहेत.  त्यामुळं आता नव्यानं मुलायम, अखिलेश आणि शिवपाल उमेदवारांची निवड करणार आहेत.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलायम सिंह यादव यांचं कुटुंब विखुरलं होतं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री  अखिलेश यादव आणि चुलत भाऊ रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं होतं. आता ते मागे घेण्यात आलं आहे. अबू आझमी, आझम खान  यांच्यासह अखिलेश यादव मुलायम सिंह यांच्या घरी पोहोचले होते. इथे त्यांची बैठक झाली. यावेळी अखिलेश यादव यांनी 207 आमदारांची यादी मुलायम सिंह  यांना सोपवली.
अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. पण मुख्यमंत्री अखिलेश यादव मुलायम यांच्यावर भारी पडल्याचं चित्र  पाहायला मिळालं. कारण अखिलेश यांच्या बैठकीत 198 आमदार आणि 25 मंत्री उपस्थित होते. तर मुलायम यांच्या बैठकीत आतापर्यंत केवळ 11 आमदार आणि  67 उमेदवार दाखल झाले. दरम्यान, या बैठकीत अखिलेश यादव यांना अश्रू अनावर झाले. मी वडिलांपासून वेगळा झालेलो नाही. उत्तर प्रदेश विधानसभा जिंकून  त्यांना भेट देणार, असं अखिलेश म्हणाले.