पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूचा बळी
पुणे, दि. 31 - चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात एका 16 वर्षीय तरुणाचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
थेरगाव येथील हा रुग्ण असून, रुग्णाला रुग्णालयात बुधवारी (दि.28) दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा (शुक्रवारी) सायंकाळी सव्वापाच वाजता मृत्यू झाला.
याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय म्हणाले की, आम्ही या पार्श्वभूमीवर तातडीने शहरातील रुग्णालयांची बैठक बोलावून सर्व आढावा घेतला आहे. शहरात या व्यतिरिक्त अन्य कोणताही सदोष रुग्ण आम्हाला आढळला नाही. तसेच आम्ही सर्व रुग्णालयांना याबाबत जनजागृती करण्याचेही आवाहन केले आहे. तसेच महापालिकेकडे सर्वच औषधांचा व इतर यंत्रणेचा पुरेसा पुरवठा आहे. मात्र, नागरिकांनाही थंडी, ताप, अशी लक्षणे आढळताच रुग्णालयात जावे, गर्दी टाळावी, असे आवाहनही यावेळी रॉय यांनी केले.
चालू वर्षात स्वाईन फ्ल्यूचा हा दूसरा मृत्यू असून वर्षभरात 7 सदोष रुग्ण महापालिका हद्दीत आढळले आहेत.