Breaking News

तक्रार निवारणासाठी परराष्ट्र खात्याची ’ट्विटर सेवा’ लाँच

नवी दिल्ली, दि. 25 - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे अनेकांना मदत केल्याची उदाहरणे ऐकिवात आहे. मात्र आता कदाचित तुम्हाला स्वराज यांना ट्वीट करण्याची गरज भासणार नाही. कारण परराष्ट्र खात्याने नागरिकांसाठी खास ‘ट्विटर सेवा’ हे ट्विटर हँडल सुरु केलं आहे. हे ट्विटर हँडल जवळपास 200 पेक्षा जास्त पासपोर्ट कार्यालये आणि विभागीय कार्यालयांमधून हँडल केलं जाणार आहे. यामुळे आता तक्रार निवारण करण्याची प्रक्रिया सोपी होईल, असा परराष्ट्र खात्याचा अंदाज आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते ही सेवा लाँच करण्यात आली. परराष्ट्र खात्यातील सर्व तक्रारींचं निवारण एका छताखाली होईल, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितलं. 200 पेक्षा जास्त ठिकाणाहून हे ट्विटर हँडल केलं जाणार आहे. यामध्ये 198 एंबीसींचा आणि 29 विभागीय पासपोर्ट कार्यालयांचा समावेश असेल.