Breaking News

प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार ः शरद पवार

। पंतप्रधानांच्या राजानाम्याच्या मागणीत आम्ही नाही

अहमदनगर, दि. 30 - प्रत्येकाला आप आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. पण आपल्याकडे अगोदर सक्षम नेतृत्व आहे का याचा विचार व्हायला पाहिजेत.  डाव्यांनी केलेल्या पतंप्रधानांच्या राजीनाम्याच्या विषयावर आम्ही नाही अशी स्पष्टोक्टी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
गुरुवार दि.29 रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिलीप वळसे पाटील, मधुकर पिचड, जिल्हाध्य चंद्रशेखर  घुले, अंकुश काकडे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, आ.शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर आदीसह मान्यवर मोठ्य संख्येने  उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. नोटाबंदीच्या विषयावर डाव्या पक्षांशी पंतप्रधानांच्या राजीनामन्याची  मागणी केली. वास्तविक नोटाबंदी संदर्भात पर्यायी व्यवस्था उभी करायला पाहिजे होती ती दिसुन येत नाही. पण राजीनाम्याच्या विषयात आम्ही नाही असे ते  म्हणाले, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी श्‍वेतपत्रीका काढवी अशी माशी मागणी केली आहे. संसदेच्या कक्षेत जे नियम आहे त्याला अनुसरुन त्यांनी मागणी  केली आहे ती योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओबीसी मंत्रालयाच्या बाबतीत घेतलेला निर्णय योग्य आहे. आरक्षणाचा विषय सध्या सुरु आहे. मुस्लिम, मराठा आरक्षणाचा विचार पुढे येताना दिसत आहे. दलित  आणि ओबीसींना मिळणार्‍या आरक्षण सवलतींना धक्का न लावता आरक्षण देण्यास हरकत नाही असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.