बिपीन रावत, बी. एस. धनाओ यांनी पदभार स्वीकारला
नवी दिल्ली, दि. 31 - लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी आज लष्करप्रमुख पदाचा तर एअर चीफ मार्शल बी. एस. धनाओ यांनी आज सकाळी 11 वाजता हवाईदलप्रमुख पदाचा भार स्वीकारला. मावळते लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग व हवाईदलप्रमुख अरूप राहा यांचा कार्यकाळ संपल्याने रावत आणि धनाओ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी दलबीर सिंग सुहाग आणि अरूप राहा यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्वीकारला आणि अमर जवान ज्योत येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली.