पीसीबी, बीसीसीआय यांच्यात रंगणार कायद्याचा खेळ
कराची, दि. 31 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात कायद्याची मदत घेण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाला परवानगी देण्यात आली आहे. ‘पीसीबी’च्या नियमन मंडळाने मंडळाला कायदेशीर कारवाईबाबतची परवानगी दिली आहे. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्यात 2014मध्ये क्रिकेट मालिकांबाबत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे होता. पण, उभय देशांमधील राजकीय परिस्थिती पाहता क्रिकेट मालिका न खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे या सामंजस्य कराराचा अनादर केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळ ‘बीसीसीआय’विरोधात कायदेशीर पाऊल उचलणार आहे.