Breaking News

आधार पेमेंट अ‍ॅप : अंगठा दाखवा; पेमेंट करा

मुंबई, दि. 25 - डिजिटल पेमेंटसाठी केंद्र सरकारकडून अनेक नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्यातच कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने आज एक मोठं पाऊल उचललं जाणार आहे. सरकारकडून आज एक नवं मोबाईल अ‍ॅप लाँच केलं जाईल, ज्याद्वारे कुठेही केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. या अ‍ॅपच्या वापरासाठी ग्राहक म्हणून कोणताही फोन वापरण्याची गरज नाही. केवळ तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणं गरजेचं आहे. शिवाय दुकानदाराकडे स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक मशिन असणं गरजेचं आहे. मात्र फिंगरप्रिंट स्कॅनरचा मोबाईल असेल तर बायोमेट्रिकचीही गरज नाही.