येशु ख्रिस्तांच्या विचारांची समाजाल गरज ः साळवे
। ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमस निमित्त मिठाई वाटप
अहमदनगर, दि. 26 - येशु ख्रिस्तांच्या विचाराची समाजाला गरज आहे. प्रभु येशूंनी शांती, द्या व मानवतेचा संदेश दिल्याचे अरविंद साळवे यांनी सांगून, मित्र मंडळाच्या वतीने सर्व धर्मियांचे सण, उत्सवात राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली.ख्रिसमस निमित्त बालिका आश्रम परिसरातील ख्रिस्ती बांधवांना धम्म सेवक अरविंद साळवे मित्र मंडळाच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी भुजंग पानझडे, गणेश म्हस्के, मा.ए.एस.आय. भगवान साळवे, अजय साळवे, अशोक पारधे, सुनिल पारधे, भाऊ साळवे, विनोद साळवे आदि उपस्थित होते.
शहरासह जिल्ह्यात ख्रिसमस उत्साहात
ख्रिसमस निमित्त कोठी येथे जवान मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना ब्लॅकेटचे व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी कोतवाली पोलिस स्टेशमचे पो.नि. सोमनाथ मालकर, मा.नगरसेवक रुपसिंग कदम, विनोद कदम, उबेद शेख, मुन्नाशेठ चमडेवाले, रेव्ह.पी.जी. घोडके, रेव्ह. सुनिल भांबळ राजू देठे, आर.आर. पिल्ले, गौरव ढोणे, विजय कांबळे, सुधीर शिंदे, आकाश साळवे, बिरजू जाधव, स्वप्निल शिंदे आदिसह शहरातील विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.