स्टिव्ह स्मिथ विचित्र कर्णधार : वॉर्नर
मेलबर्न, दि. 25 - सलग दोन कसोटी सामने जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलिया संघ आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांना टीकेचे धनी होण्याची वेळ आली आहे. क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहतेच नाहीत, तर आता थेट उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही यात उडी घेतली असून, स्मिथ एक विचित्र कर्णधार असल्याचे त्याने म्हटले आहे.
पाकिस्तानला विजयासाठी 490 धावांचे आव्हान देऊनही ऑस्ट्रेलियाला केवळ 39 धावांनी विजयावर समाधान मानावे लागले होते. मोठा विजय मिळविण्यात अपयश आल्यामुळेच विजयानंतरही स्मिथला टीकेचा रोष सहन करावा लागत आहे. पहिल्या डावात पाकिस्तान 287 धावांनी पिछाडीवर असतानाही त्यांना फॉलो ऑन न देण्याच्या निर्णयापासून ते दुसर्या डावातील क्षेत्ररचना आणि गोलंदाजीतील बदल या सर्वांमध्ये स्मिथने असंख्य चुका केल्या, असेच सर्वांचे म्हणणे आहे.