विलासराव पाटील-वाठारकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रम
कराड, दि. 26 (प्रतिनिधी) : कराड जनता उद्योग समुहाचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते स्व. विलासराव पाटील-वाठारकर (बापू) यांची ऐंशी वी जयंती मंगळवार, दि. 27 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. या जयंतीचे औचित्य साधून दि. कराड जनता सहकारी बँकेने निर्मित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, केंद्र शासनाच्या कॅशलेस व्यवहार योजनेस प्रोत्साहन देणेच्या हेतूने बँकेने जारी केलेल्या स्वाईप मशिनचे प्रातिनिधीक स्वरुपातील वितरण आणि बँकेच्या ठेववाढ पंधरवडा अभियानाचा शुभारंभ सिक्कीम राज्याचे महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या शुभहस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेआठ वाजता बँकेच्या शिवाजीनगर, कराड येथील मुख्य कार्यालयात संपन्न होत आहे, अशी माहिती कराड जनता बँकेचे अध्यक्ष तथा सातारा डी. सी. सी. बँकेचे संचालक राजेश पाटील-वाठारकर, बँकेचे उपाध्यक्ष विकासराव धुमाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव सुर्यवंशी यांनी दिली.
स्व. वाठारकरबापू यांच्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यालयाबरोबरच कराड जनता बँकेच्या राज्यातील सर्व 29 शाखा आणि 2 विस्तारीत कक्षामध्ये रविवारी सकाळी 10 वाजता बापूंच्या प्रतिमेला अभिवादन करुन त्या-त्या परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि सेवकाच्या उपस्थितीत ठेववाढ पंधरवडा अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या संचालक मंडळाने केले आहे.