महाराष्ट्र अंनिसतर्फे व्यसनविरोधी मोहीम : डॉ. हमीद दाभोलकर
सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षापासून 31 डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण या दिवशी व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमी महाराष्ट्र अंनिसतर्फे ’चला व्यसन बदनाम करु या’ ही व्यसन विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 15 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये व्यसनविरोधी सप्ताह राबवणार असल्याची माहिती अंनिसचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. दाभोलकर म्हणाले, सध्या समाजात व्यसनाचे उदात्तीकरण होत आहे. त्यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबर शासनाने समग्र व्यसन विरोधी नीती जाहीर करावी. यासाठी या पंधरवड्यादरम्यान पाठपुरावा केला जाणार आहे. दि. 31 डिसेंबरला ‘दारु नको दूध प्या’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन राजवाडा येथे केले आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारुचे दुष्परिणाम सांगून दारु ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेमध्ये व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करायचे असेल त्यांना परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेमार्फत मोफत एक दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा नागरिकांनी परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.