Breaking News

मेंदूला सारखं सांगतो, कुठलाच चुकीचा शब्द जाऊ देऊ नकोस : अजित पवार

बारामती, दि. 24 - अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अजित पवार गोत्यात आले होते. मात्र, वेळेवेळी त्यांनी त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. असे वादग्रस्त काही आपल्या तोंडून निघू नये म्हणून मेंदूला सांगत असतो, असे बारामतीतल्या एका सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार समारंभ आज बारामतीत पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
मी सारखं माझ्या मेंदूला सांगत असतो की, ये शहाण्या दुसर्‍या मेंदूला कुठलाच शब्द चुकीचा जाऊ देऊ नकोस. कारण मानवाला दोन मेंदू असतात, असे म्हणत अजित पवार म्हणाले. आपण बोलताना भान ठेवावं, असा सल्ला अजित पवार यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना दिला. तर, मीही बोलताना आता खूप काळजीपूर्वक बोलत असल्याचेही अजित पवारांनी आवर्जून सांगितले.