Breaking News

जिंगल बेल, जिंगल बेल जिंगल ऑल द वे ! ख्रिसमस हर्षोल्हासात साजरा

पुणे, दि. 26 -  जिंगल बेल जिंगल बेल, जिंगल ऑल द वे, विश यू अ मेरी ख्रिसमस अ‍ॅण्ड हॅपी न्यू इयरअशा शुभेच्छा देत ख्रिश्‍चन बांधवांनी आज ख्रिसमस  उत्साहात साजरा केला. ख्रिश्‍चन धर्मिंयासाठी अंत्यत पवित्र असणारा आणि आंनदोल्हासाचा सण असणार्‍या  ख्रिसमस म्हणजेच नाताळ. या दिवशी येशूच्या  जन्मानिमित्त सामूहिक प्रार्थना करण्यात येते. शहरातील ख्रिश्‍चन बांधवांनी ठिकठिकाणीच्या चर्चमध्ये जाऊन सामूहिक प्रार्थना केली.
चिंचवड येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च, दापोडी येथील विनियार्ड चर्च, पिंपरी येथील द युनायटेड चर्च, आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्च, त्रिवेणीनगरयेथील सेंट  जीझस चर्च, निगडी येथील ऐलिम मेथिक्रिस्ट चर्च आदी ठिकाणच्या चर्चमध्ये रविवारी (दि.25) सकाळपासूनच ख्रिश्‍चन बांधवांनी उपस्थित राहण्यास सुरूवात  केली होती.
ख्रिसमसच्या एक दिवस अगोदर म्हणजेच शनिवारी (दि. 24) तारकाच्या जन्माचे जोरदार स्वागत शहरामध्ये करण्यात आले. शनिवारी रात्री बारा वाजता ख्रिस्ती  बांधवांनी ख्रिस्ताच्या जन्माचे आतषबाजीने जोरदार स्वागत केले. शनिवारी रात्री लहानथोरांसह सर्वांनी नवीन वस्त्रे परिधान करून चर्चमध्ये प्रार्थनेसाठी हुडहुडी  भरवणार्‍या थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध चर्चमध्ये शनिवारी रात्री बारा वाजता प्रार्थना व शांती-सद्भावनेचा संदेश देण्यात आला. ख्रिश्‍चन बांधवांनी नवीन कपडे परिधान  करीत पुष्पगुच्छ, मेणबत्ती, केक आणून रात्री प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गर्दी केली होती. प्रार्थना व संदेश ऐकून शुभेच्छापत्रांची देवाणर्‍घेवाण करीत ख्रिसमस उत्साहात  साजरा करण्यात आला. तसेच, ठिकठिकाणच्या चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.
शहरामध्ये विविध ठिकाणी असणार्‍या  चर्चमध्ये रविवारी ख्रिस्ती बांधवांसह इतर समाजातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सर्व धर्म, सम,  भावाची शिकवणूक काही चर्चमधून संदेश देण्यात आला. चर्चमध्ये विद्युत रोषणाईने सजवलेल्या ख्रिसमस ट्री ने वातारणामध्ये उत्साह निर्माण केला होता. पुष्पगुच्छ,  मेणबत्त्या, शुभेच्छा पत्रे घेऊन ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये दाखल होत होते.