वाहनचोरी करणारे सराईत गुन्हेगार गजाआड
पुणे, दि. 26 - पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण परिसरातून वाहन चोरी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.24) रात्री आठच्या सुमारास काळेवाडी रोड येथे करण्यात आली.
चंद्रकांत राजेंद्र गायकवाड (वय 28, रा. चांडवली फाटा, ता. खेड, पुणे) आणि विठ्ठल अशोक उंबरे (वय 32, रा. नाणेकरवाडी, यशवंत कॉलनी, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार (दि.27) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून चिंचवड परिसरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे पोलिसांनी हद्दीत गस्त वाढवली होती. शनिवारी चिंचवड पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी काळेवाडी रोडकडून चित्तराव गणपती मंदिराच्या दिशेने दुचाकीवर येत होते. त्यांच्या दुचाकीस नंबर प्लेट नसल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला.