Breaking News

चोपड्याच्या नागपुरे बंधूंचे मुंबईत चित्र प्रदर्शन

जळगाव, दि. 27 -  येथील वसंत नागपुरे व पंकज नागपुरे या कलाशिक्षक बंधूंचे आज पासून वरळी, मुंबई येथील नेहरू सेंटर येथे ‘आनंद कलाक्षर’ चित्र व कॅलीग्राफी चित्र प्रदर्शन सुरु होत आहे. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान होणार्‍या या प्रदर्शनाचे उद्घाटन 27 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते होणार असून मुंबई येथील वरिष्ठ कला निर्देशक जैन कमल, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर, ‘आमराई’संस्थेचे अध्यक्ष सॅमुएल नाझरेथ (मुंबई) व ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वसंत नागपुरे हे चोपडा तालुक्यातील घोड़गाव येथील सी बी निकुंभ महाविद्यामध्ये तर पंकज नागपुरे हे चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघा  बंधूंची यापूर्वी चोपडा व पुणे येथे चित्र प्रदर्शने झाली आहेत. दोघांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दोघेही उपक्रमशील कलाशिक्षक आहेत.