Breaking News

शालांत परिक्षेच्या परीक्षा फॉर्मसाठी14 फेब्रुवारीपर्यंत मुदत

औरंगाबाद , दि. 27 - मार्च 2017 मध्ये होणा-या दहावीच्या परीक्षेस नियमित प्रविष्ट होणारे, पुर्नपरिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पूर्वीचे खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची आवेदनपत्रे अतिविलंब शुल्कासह भरण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.
अतिविलंब शुल्कासह प्रतिदिन प्रतिविद्यार्थी 50 रुपये 14 डिसेंबर ते 15 जानेवारी, विशेष अतिविलंब शुल्कासह (प्रतिदिन प्रतिविद्यार्थी 100 रु.) 16 ते 30 जानेवारी, अतिविशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र (प्रतिदिन प्रतिविद्यार्थी 200 रु.) शुल्क याप्रमाणे 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. राज्य मंडळ कार्यालयाकडून अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्वीकारण्याची मंजुरी परीक्षा सुरू होण्यापूर्वी घ्यावी. 14 जानेवारीनंतर ऐनवेळी प्राप्त होणा-या आवेदनपत्रास मंजुरीबाबतचे प्रस्ताव सबख कागदपत्रांसह पाठवून मार्च 2017 पूर्वी मान्यता घ्यावी लागेल.