Breaking News

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ः अ‍ॅड. मुळीक

सांगली, दि. 31 - खानापूर तालुका त्वरीत टंचाईग्रस्त जाहीर करुन मागणीनुसार टँकर सुरु करावेत, शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून होणारी टेंभूच्या वीजबिलाची  कपात रद्द करावी, महावितरणने केलेली शेतीपंपाची दरवाढ रद्द करावी, टेंभूच्या सुधारित आराखड्यात 17 गावांचा समावेश व्हावा, या मागण्या आहेत. त्यांचा  विचार करावा. 2 जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास 9 जानेवारीपासून तहसीलसमोर धरणे आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीच खानापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब  मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, खानापूरच्या उत्तर व पूर्वभागात कमी पाऊस झाला. भीषण स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. आढावा घेऊन उपाययोजना झाल्या  नाहीत. तालुका टंचाईग्रस्त जाहीर करुन मागणीनुसार टँकर सुरु करावेत. तांत्रिक कामे सुरु आहेत. लोकांना रोजगार उपलब्ध होतील, अशी कामे सुरु करावीत,  टेंभूचे पाणी शासनाने वीजबिल भरुन सोडले आहे. परंतु ऊस बिलातून टेंभूच्या वीजबिलाची कपात केली जाते. अन्यायकारक कपात रद्द करावी, ज्यांची कपात  झाली त्यांना ती रक्कम परत मिळावी, महावितरणकडून शेतीपंपाची 9 ते 15 टक्के दरवाढ रद्द व्हावी, टेंभूचे आवर्तन त्वरित सुरु करुन वीस गावांतील ओढे,  नाल्यांत पाणी सोडावे, टेंभूच्या सुधारित आराखड्यात सतरा गावांचा समावेश करावा, या मागण्या आहेत.